कन्हाळा खुर्द येथील विवाहितेचा मृत्यू

0

भुसावळ- कन्हाळा खुर्द येथील अर्चना भरत चौधरी (26) यांच्यावर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅपेंडीक्सची शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शहरातील कोणार्क हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगड यांनी पंचनामा केला. सहायक फौजदार शशिकांत चौधरी तपास करत आहे.