कन्हाळ्यात हातभट्टीची भट्टी उद्ध्वस्त : 31 हजारांचे रसायन नष्ट

भुसावळ : तालुका पोलिस ठाणे हद्दीतील किन्ही शिवारात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई करीत पेटत्या भट्टीवरून गूळ, मोह नवसागर मिश्रित द्रव्याचे सुमारे 900 लिटर रसायण नष्ट करण्यात आले तसेच 25 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौर, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, सुनील चौधरी, विठ्ठल फुसे, गणेश राठोड, जगदीश पाटील, पोलिस पाटील रेवसिंग पाटील यांनी केली आहे.