कन्हेरी येथे श्रावणी यात्रा

0

बारामती : कन्हेरी येथे श्रावणी शनिवारची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेकरिता हजारो भाविक आले होते. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मारुतीच्या मुर्तीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक धार्मिक कार्यक्रमालाही भाविकांनी हजेरी लावली.

कन्हेरी येथे दुपारी 12:00 वाजता गाजत पालखी निघली. देवीच्या मंदिरापासून पालखी मारुती मंदिराकडे आणण्यात आली. अतिशय उत्साहात गावातील नागरिक यामध्ये सामील झाले होते. पालखी खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पहाटे 5 वाजता मंदिरात आरती घेण्यात आली. श्रावणातील शेवटच्या शनिवारी कन्हेरी येथे यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमेटीने यात्रेचे नियोजन केले होते. सायंकाळी 5 वाजता येथील आखाड्यात कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातार्‍यातूनही पहिलवान येथे आले होते. कन्हेरी येथील मारुती देवस्थान काटेवाडीपासून 3 किमी अंतरावर आहे. यामुळे दर्शनाकरिता काटेवाडी येथून भाविकांकरिता वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.