कन्हैय्या कुमारने अर्ज भरला; स्वरा भास्करने प्रचार करत साजरा केला वाढदिवस

0

बेगूसराय – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी कन्हैय्या कुमार याने आज लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आईचा आशीर्वाद घेऊन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घर सोडले. कन्हैय्या यांच्या रॅलीत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी सहभागी होते. विशेष म्हणजे सातत्याने भाजप व सरकारवर टीका करणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर हिने कन्हैय्या कुमारसाठी प्रचार करत आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात केली.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या 31 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना स्वराने ना मित्रांसोबत पार्टी केली, ना मैत्रीणींसोबत आऊटींगला गेली. स्वराने बेगुसराय मतदारसंघातील कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी स्वरासह तिचे जवळचे मित्रही बेगुसरायमध्ये दाखल झाले आहेत. तर जेएनयुमधील विद्यार्थी संघटनेचे नेते आणि विद्यार्थीही कन्हैय्याच्या प्रचारासाठी हजर झाले आहेत.