जळगाव । भडगाव तालुक्यातील सिंदी कोळगाव येथे बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कपडे धुवण्याचे पाणी उडाल्याने दोन तरूणांनी एकास बेदम मारहाण केली. जखमी तरूणाला उपचारसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंदी कोळगाव येथे पंडीत नागो सरदार (वय 40) हे शेतकरी त्यांचा कुटुंबियांसह राहतात. त्यांची मुलगी रुचीता सरदार बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर कपडे धुवत होती. त्यावेळी काही पाणी बाजुला उडाल्याने मोहन मदन पाटील, राहूल दिलीप पाटील यांनी सरदार यांच्या घराजवळ येऊन शिवगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पंडीत सरदार यांना मोहन पाटील आणि राहूल पाटील यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी सरदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.