जळगाव – अंगणात संरक्षण भिंतीत असलेल्या लोखंडी गेटवर कपडे वाळत टाकत असतांना गेटचा विजेचा जोरदार धक्कयाने मीराबाई अशोक पाटील (वय 50) रा. समता नगर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, मीराबाई पाटील हे आपल्या पती अशोक सिताराम पाटील (वय 55) व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. दोन्ही मुले तसेच पती हातमजुरीच्या कामावर गेले होते. घरी एकट्या असलेल्या मीराबाई हे कपडे वाळत टाकत असतांना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. घरासमोर राहणार्या एका महिलेच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. आजुबाजूचा राहणार्या तरुणांनी डीपीवरील फ्युज काढून त्वरित वीज प्रवाह खंडित केला. रहिवाशांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी मीराबाई हिस मृत घोषित केले.
वीजचोरीची मजबुरी अन् जीव गमाविला
समता नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून डीपी नसल्याने समतानगर रहिवाशांना वीजेअभावी अनेक अडचणींना सामना करावा लागतो याकडे नगरसेवकांचीही देखील दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजास्तव समता नगर रहिवाशांनी थेट डीपीवरून अवैधरित्या अवैधरित्या विजेची चोरी करत आहे. त्यामुळे परिसरातील सर्व स्थानिक रहिवाशांचे वायरी मयत झालेला मिराबाई पाटील यांच्या घरावरून गेलेल्या होत्या. पत्राचे घर असल्यामुळे पाऊस सुरू असल्यामुळे पत्र्याच्या घरात विजेचा प्रवाह वसलेला असल्याने आज सकाळी 11.30 वाजेच्यापूर्वी त्या विजेच्या धक्क्याने मयत झाल्या.
कुटुंबियांच्या आक्रोश
मयत मीराबाईचा मोठा मुलगा आणि सुन हे वेगळे राहत असल्याने गणेश अशोक पाटील हा कामाला गेला होता तर सुनबाई माहेरी गेली होती. दुसरा मुलगा योगेश अशोक पाटील हा गुजरातमधील वलसाड येथे नोकरीला आहे. तर मुलगी बालाबाई गजानन पाटील ही जावयासह घरासमोरच राहतात आज सकाळी पती अशोक सिताराम पाटील हे हात मजुरीसाठी कामावर गेले असताना घरात कोणी नसल्याने हा प्रकार घडला. माहिती मिळताच कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात गाठले व आक्रोश केला.