शहादा। तालुक्यातील प्रकाशा येथील तोरडे पेट्रोलपंपवर अज्ञात चोरटानी लोखंडी कपाट तोडुन 81 हजार चोरून नेल्याची घटना घडली आहे.
शहादा पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी आनंद कुवरजी गावीत रा प्रकाशा याने दिलेल्या फिर्यादी वरून दि 20 रोजी राञीचा दहा वाजेनंतर 21 रोजी 3 वाजेच्या दरम्यान आर पी टोरडे पेटोल पंप वरील मुख्य कार्यालयाचा दरवाजा हुघडुन लोखंडी कंपाट्याचे लॉकर तोडुन चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. या घटनेबाबत शहादा पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल असुन पुढील तपास गौतंम बोराळे करीत आहे.