कपाशी वेचण्याचा जाब विचारल्याने एकाला शिविगाळ

The three abused one in Chitoda for asking him to pick cotton यावल : तालुक्यातील चितोडा येथे सामाईक शेतातून कपाशी वेचून घेतली याबाबत तिघांना विचारणा केल्याचा राग आला व त्यांनी एकाला शिवीगाळ करून दमबाजी केल्याने यावल पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
चितोडा येथील शुभम नितीन धांडे यांचे सामायीक शेत आहे. या शेतातून सोनाली सागर धांडे, सुनीता संजय धांडे व सागर संजय धांडे या तिघांनी कापूस वेचला. याबाबत शुभम धांडे यांनी तिघांना विचारले की, तुम्ही सामायीक शेतातील कापूस का वेचला ? हे विचारण्याचा राग आल्याने तिघांनी शुभम धांडे यांना शिवीगाळ करून दमबाजी केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलि ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.