कपिलचा शो पुन्हा ठरला नंबर १

0

मुंबई : कॉमेडीचा किंग कपिल शर्मासाठी २०१८ हे वर्ष खूप चढ- उतारांचं गेलं. अनेक कारणांमुळे तो वादात राहिला. सहकलाकार साथ सोडून गेले नवीन शोदेखील दोन एपिसोडनंतर बंद पडला. मात्र ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन तो गेल्या महिन्यात परतला अवघ्या दोन आठवड्यातच तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार ठरला.

हा नवा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी आला आणि कपिलनं आपलं मनोरंजन विश्वातलं स्थान परत मिळवलं.