अमळनेर । धुळे व जळगावच्या सिमेरेषेवर पांझरा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिराच्या यात्रेस् सुरुवात झाली आहे. या मंदिराला एक हजार वर्षापूवीचा इतिहास लाभलेला असल्याने या ठिकाणी कपिलमुनींनी तपश्चर्या करुण महादेवाची पिण्डीची स्थापना केली होती. यामुळे या मंदिराला कपिलेश्वर महादेव मंदिर हे नाव पडले आहे.या मंदिराचे बान्धकाम 17 व्या शतकात झाले आहे.त्यानंतर थोरसमाज सेविका अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेखात आढळून येते.तर दिपमाळा जवळील दुसर्या शिलालेखात दादोजी नेवाडकर 1688 शके नाम संवत्सर असा उल्लेख आहेत. याठिकाणी तिन वर्षापुर्वीच अखिल भारतीय संत संमेलन बाराबंकीचे महाराज हंसानंदजी महाराज यांनी घडवून आणले होते. यामुळे या मदिराची सर्वत्र देशभर किर्ती पसरलेली आहे. हेमांड पंथी बांधकाम, कोरीव नक्षीकाम हे उत्कृष्ठ शिल्पकलेचा नमूना असलेले 17 व्या शतकात कपिलेश्वर मंदिर उभारण्यात आल्याचे येथील शिलालेखात लिहीले आहे. खानदेशातील एकमेव मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाची रचना आकर्षक असून दगडी सभामंडप, तिन्ही दिशांना प्रवेशद्वार आहे प्रत्येक मार्गावर अर्धमंडप आहे 16 दगडी स्तंभावर सभामंडप उभा आहे, मंदिराच्या समोर उंच दगडि दिपमाळा,समोरून वाहणारी तापी नदी, मंदिरा मागून पांझरा नदी, चहोबाजूला निसर्गरम्य वातावरण असे विलोभनीय वातावरण, मंदिराच्या गाभार्यात तिन शिवपिंडी असून सकाळ चे पाहिले सूर्य किरण मंदिरातून त्रिपिंडीवर पडते.
पाचोर्यात महाशिवरात्री निमित्त
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
पाचोरा । शहरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटे पासूनच रांगा लावून दर्शन घेतले. हिवरा नदीवरील महादेव मंदिर, भडगाव रोड वरील सिद्धेश्वर मंदिर, कॉलेज चौकातील महादेव मंदिर वरखेडी नाका, पांचाळेश्वर मंदिर, तसेच ग्रामीण भागातील पिंपळगाव (हरे) येथील हरेहरेश्वर मंदिर, संगमेश्वर व उहेमाडपंथी महादेव मंदिर त्याचप्रमाणे बांबरुड (महादेवाचे) येथील उतावली व गिलोच्या संगमावरील महादेव मंदिर, जारगाव येथील नाथ मंदिर, वाणेगाव व निंभोरा येथील पुरातन मंदिर, वेरुळी येथील महादेवाचे मंदिर अशा विविध ठिकाणी महिलांनी व पुरुषांनी बेलपत्ते वाहून अभिषेक केला. दर्शनाच्या रांगेत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष व युवतींचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेक ठिकाणी दर्शनाच्या वाढलेल्या रांगेमुळे यात्रेचे स्वरुप अधिक होते. स्थानिक ठिकानी गेल्या दोन दिवसापासून मंदिर परिसर स्वच्छता करुन रंग, रांगोळी, पताके, भगवे झेंडे लावून मंदिर परिसरातील भाग स्वच्छ ठेवला. बाहेरगावी जाणारे व बाहेरगावाहून येणार्या भाविकांसाठी स्थानिक भक्तांनी साबुदाण्याची खिचडी, केळी, द्राक्षे, चिकू यासारखे फराळाचे वाटप केले.
भाविक दोन दिवस अगोदर दाखल
धुळे व जळगाव जिल्हाच्या सिमारेषेवर असलेले या मंदिराच्या यात्रोत्सवात गुजरात मध्यप्रदेश नंदुरबार, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आदी भागातून भाविक नवस फेडण्यासाठी दोन दिवस अगोदरच दाखल झाले आहेत या ठिकाणी वरणबट्टीचा खान्देशी नैवद्य कपिलेश्वराला दाखविला जातो. हा यात्रोउत्सव जवळपास पंधरा दिवस सुरु असतो.या ठिकाणी उपहारगृह व संसार उपयोगी वस्तुंचे दुकाने थाटले आहेत. या यात्रोत्सवात तापी नदीपात्रात नौकानयन करण्याचा आनंद भाविक घेतात. मात्र मंदिर परिसरात नदीचा खोल डोहातील पाण्यात लहान मुले व महिलांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन मंदिर व पोलीस प्रशासनाने केले आहे. तर मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व सहकारी यांचा सलग 15 दिवस बंदोबस्त राहणार आहे.