गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीमुळे चर्चेत राहिला आहे. टी-20 विश्वचषकात देखील हार्दिक पांड्या ने केवळ दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी केली होती. यामुळे त्याच्यावर नेटकरी नाराज असून आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रकट करत असतात.
यातच भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू तसेच कर्णधार कपिल देव यांनी देखील हार्दिक पांड्या वर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी कपिल देव म्हणाले की, हार्दिक पांड्या दुखापतींनी त्रस्त असून गेल्या अनेक सामन्यापासून तो गोलंदाजी करत नाहीये अशा परिस्थितीत त्याला अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणणे योग्य ठरेल का ?