मुंबई: कपिलच्या चाहत्यांना एक खुशखबर आहे. कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा अखेर पुनरागमन करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या कपिलनं आपल्या नवा कोऱ्या शोला अवघ्या तीन एपिसोडमध्येच सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर पूर्वाश्रमीची प्रेयसी प्रिती सिमोन्स आणि काही पत्रकारांसोबत झालेल्या ट्विटर वॉरनंतर कपिलनं छोट्या पडद्यापासून फारकत घेतली.
दोन महिन्यांपूर्वी त्यांनी ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. प्रकृतीच्या कारणास्तव आपण मनोरंजन विश्वापासून काही काळ विश्रांती घेत असल्याचं त्यानं म्हटलं होते. कपिलनं नुकताच चॅनेलशी संवाद साधला आहे. यावेळी त्यानं काही नव्या कल्पना चॅनेलला ऐकवल्या. या कल्पनांना चॅनेलनं मंजूरी दिली तर लवकरच कपिलचा नवा शो सुरू होईल.
कपिलची कल्पना जर चॅनेलच्या पसंतीस उतरली तर लवकरच कपिल प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवताना दिसेल.