मुंबई : कॉमेडीचे किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जोडीने संपूर्ण देशाला हसवलं. मात्र काही वाद विवादामुळे ही जोडी तुटली. आजही कॉमेडीचे नाव घेतले की, डोळ्यासमोर ही येते. आता सुनीलनेदेखील आपल्या यशाचे श्रेय कपिल शर्माच्या देत आहे.
कपिल शर्माचा शो हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट असल्याचे त्याने म्हटले आहे. कपिल शर्माच्या शोने मला प्रचंड प्रेम आणि ओळख दिली. याच व्यासपीठामुळे मी घराघरांत पोहोचलो. या शोचा मी एक भाग होतो यासाठी देवाचे आभार मानतो, असेही पुढे तो म्हणाला.