कपिल शर्माने ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांना दिली खुशखबर!

0

मुंबई : चाहत्यांना कपिल शर्माने ट्विटरवरून दिली ही गोड बातमी मागचे अख्खे वर्ष कपिल शर्माची कसोटी पाहणारे ठरले. मागच्या वर्षी सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे भांडण झाले आणि इथून कपिलचे वाईट दिवस सुरू झाले. यानंतर कपिलबद्दल वाईट बातम्याच जास्त आल्यात. सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्या झाल्या कपिल मद्याच्या आहारी गेल्याची बातमी आली. मग तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे कानावर आले.

कपिल शर्माने ट्विटरवर म्हटले आहे की, जल्द ही वापस आ रहा हूँ..  तुमच्यासाठी द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊन येत आहे. ही बातमी कपिलने सोशल मीडियावरून दिल्यावर त्याचे चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत.