मुंबई : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी काही दिवसांपूर्वी तुटली होती. त्यांच्या वादामुळे चाहत्यांची खूप निराशा झाली होती. ही जोडी सर्व वाद मिटवून पुन्हा एकत्र कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशात आता कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे माहिती मिळाली आहे.
एका मुलाखती कपिलने स्वतः याचा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांत सुनील आणि माझ्यात अनेक भेटी झाल्या. आता आमच्यात कुठलेही गैरसमज किंवा भांडण राहिलेले नाही. सगळं काही जुळून आलं तर आमची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसेल असेही तो म्हणाला. आमच्यातील संबंध चांगले आहेत, मात्र मीडियाने आमच्यात भांडण लावले असेही त्याने यावेळी म्हटले.
आता या दोघांची जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे चाहत्यांसोबतच कपिलसाठीही ही आनंदाची बातमी आहे.