कपील शर्मा शो संपूर्ण नव्या अवतारात येणार

0

मुंबई : कपील शर्मा शो टीआरपीमध्ये वरचे स्थान मिळविण्यासाठी झगडत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या शोची सामर्थ्यस्थळे लक्षात घेऊन सोनी टीव्ही वाहिनी आणि शोचे निर्माते यांनी त्यांच्यातील करार एक वर्षाने वाढवला असून हा शो नव्या अवतारात अवतीर्ण होणार आहे.

कपील शर्मा शोचे लाखो फॅन्स आहेत. नुकताच हा कार्यक्रम त्यावर आलेल्या संकटांमुळेही चर्चेस आला होता. या शोमध्ये बदल करण्याता आता टीम गुंतली आहे. कपील शर्मा शोच्या सूत्रांनी सांगितले की शोमध्ये पूर्णपणे बदल होईल मात्र त्याचा तपशील आताच सांगता येणार नाही. सोनीकडून याबाबत अशी माहिती मिळाली की टीआरपी किंवा अन्य कोणत्याही कारणाने या शोमध्ये बदल करीत नाही पण शोच्या कर्त्यांनाच बदल हवे आहेत.

सध्याचे शो सदस्य करीत असलेले रोल बदलण्याची दाट शक्यता आहे. सुनील ग्रोव्हर परत येईल का यावर त्याला यायचे असेल तर स्वागतच आहे पण त्याला कुणी बोलावलेले नाही, असे सुत्रांनी सांगितले. विनोदी शो मॅन कपिलचे आरोग्य बिघडलेले आहे. सेटवर तो तिनवेळा आजारी पडला पण हा मुद्दा आता महत्वाचा नाही, असं टीमला वाटतेय.