धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कबड्डी असोशिएशनच्या वतीने आयोजित गरुड मैदानावर खुल्या कबड्डी स्पर्धांचा अंतिम सामना धुळे विरुध्द जळगाव या दोन्ही संघात झाला. सुरुवातीला जळगावने आघाडी घेतल्या नंतर धुळे संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत जळगाव संघाला काटे ची टक्कर दिली. शेवटच्या क्षणी जळगाव संघाच्या खेळाडुंनी खेळ आपल्या बाजूने फिरवला. विजेत्यांना राजवर्धन कदमबांडे व जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी विजयी, उपविजयी संघासोबतच उत्कृष्ट खेळाडूंचा रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक शेलार, नगरसेवक गोटु शार्दुल, सभागृह नेते कमलेश देवरे, बंटी मासुळे, नगरसेवक कैलास चाैधरी, आझाद नगर पोलीस स्टेशनचे पीआय परदेशी साहेब , नवाब बेग मिर्झा , संजय वाल्हे, महादेव परदेशी, नगरसेवक शरद वराडे, नगरसेवक संदीप पाटोळे उपस्थित होते.