मुंबई । महाराष्ट्र कबड्डी दिनाचे औचित्य साधून शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाने ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या सहकार्याने 10 ते 15 जुलै दरम्यान कबड्डी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरात 31 मुली व 43मुलांनी सहभागी झाले आहेत. या शिबिरात जीवन पैलकर, तारक राऊळ, माया मेहेर, गोपीनाथ जाधव, अनिल नागवेकर, वैशाली जाधव व शशिकांत राऊत यांनी मार्गदर्शन केले. विशेष शारीरिक तंदुरुस्ती करिता शृंगार (नानु) राऊळ यांनी मुला-मुलींना खास मार्गदर्शन केले.