गोरगान । इराण येथील गोरगान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने कोरियाचा 42-20 असा 22गुणांनी पराभव करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. मध्यांतराला 19-12अशी आघाडी घेणार्या भारताला कोरियाने चांगलेच झुंजविले. नंतर मात्र त्यांची मात्रा चालली नाही. 20गुणांची भारताने हा सामना आपल्या नावे केला. भारतीय महिला संघाचे नेतृत्व मुं. उपनगर- महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे हिने केले. भारतीय पुरुष संघाने देखील आपल्या अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संधाचा 36-22असा पाडाव करीत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला 44-18अशी धूळ चारली होती. अंतिम सामन्यात मात्र पाकिस्तानने बरी लढत दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने दोन्ही संघाचे अभिनंदन केले आहे.