कबड्डी : युनियन बँकेच्या नितीन घोगळेने टिपले एकाच चढाईत 5 गडी

0

मुंबई । मध्य रेल्वे, युनियन बँक यांनी अंकुर स्पोर्ट्स क्लब आणि डॉ.शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुरुष विशेष व्यावसायिक गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. लालबाग, गणेश गल्ली येथील स्व.अनिल कुपेरकर क्रीडांगणावर सुरू झालेल्या व्यावसायिक क गटात मध्य रेल्वेने मुं. पोलीस संघाचे कडवे आव्हान 33-30असे मोडून काढले. प्रो-कबड्डी स्टार श्रीकांत जाधव, मयुर शिवतरकर यांच्या झंजावाती चढाया आणि सुरज बनसोडे याच्या भक्कम बचावाच्या जोरावर रेल्वेने विश्रांतीपर्यंत 19-16 अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात पोलिसांच्या अनिकेत पाटील,जितेंद्र पाटील, चेतन गायकवाड यांनी तोडीस तोड लढत दिली. परंतु मध्यांतरातील आघाडी काय त्यांना मोडून काढता नाही आली. त्यामुळे त्याच 3गुणांच्या फरकाने बँकेचा पराभव झाला. व्यावसायिक दुसर्‍या सामन्यातील ब गटात युनियन बँकेने माझगाव डॉकचा प्रतिकार 42-22 असा सहज संपविला. युनियन बँकेच्या नितीन घोगळे यांने आपल्या एका चढाईत 5गडी टिपत या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याला अजिंक्य कापरेने चढाईत, तर अजिंक्य पवारने पकडीत मोलाची साथ दिली. पहिल्या डावात 26-14अशी आघाडी घेणार्‍या बँकेने दुसर्‍या डावातदेखील तोच जोश कायम ठेवत मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला.