कराड । कराड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, 20 डिसेंबर रोजी तीन सामने होणार असून स्पर्धा दुपारी 4 वाजता सुरू होणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली संघांमधील उपांत्य फेरीतील सामना पुन्हा खेळवला जाणार आहे, अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिली. कराड नगरीचे शिल्पकार पी. डी. पाटीलसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय 66 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यादरम्यान पावसामुळे सदरची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती, या स्पर्धा पुन्हा 20 डिसेंबर रोजी शिवाजी स्टेडियमवर होणार आहेत.कोल्हापूर आणि सांगली संघांमधील उपांत्य फेरीतील सामना पुन्हा खेळवला जाणार आहे.अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिली.
20 डिसेंबर रोजी राहिलेले तीन सामने होणार आहेत. 21 डिसेंबरपासून पुरुष व महिला निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिरही येथेच होणार आहे. कोल्हापूर आणि सांगली संघांमधील उपांत्य फेरीतील सामना पुन्हा खेळवला जाणार आहे. अत्यंत रंगतदार सुरू असलेला सामना पावसामुळे स्थगित करावा लागला होता. आमदार बाळासाहेब पाटील, लिबर्टी मजदुर मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्याशी चर्चा करून 20 डिसेंबरला राहिलेले सामने कराड येथे घेण्याचा निर्णय राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी घेतला होता. शिवाजी स्टेडियमवर पुन्हा कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडांगण तयार करण्यात आले असून प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. कबड्डी क्रीडारसिकांना कबड्डी सामन्याचा आनंद लुटता यावा, यासाठी सर्व व्यवस्था पूर्ववत करण्यात येत आहे.66 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने अध्यक्षस्थानी आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पात्रीकर, सहकार्यवाहक आस्वाद पाटील, लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपाध्यक्ष अरुणराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सदरच्या स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.