भडगाव। येथिल सौ.र.ना.देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी गायत्री संजय पवार हीचा ‘जिमखाना डे’ कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाने नुकताच जिमखाना डे साजरा करण्यात आला. यात भडगाव सौ.र.ना. दैशमुख महाविद्यालयाने सातवा क्रमांक मिळवला. महाविद्यालयाने सलग तिसर्या वर्षी टाँपटेनमध्ये नंबर मिळवत घोडदौड सुरु आहे. याच कार्मक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थीनी गायत्री संजय पवार हीने कब्बडी या खेळात दोन वेळा विद्यापिठ व आँल इंडीया संघात सहभाग नोदविला होता. यानिमित्ताने तिचा जिमखाना डे कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हस्ते गौरव करण्यात आला.
‘जिमखाना डे’ कार्यक्रम
कु.गायत्री पवार हिचे स्थानिक चेअरमन नानासाहेब देशमुख, प्राचार्य एन.एन. गायकवाड, क्रीडाप्राध्यापक प्रा.दिनेश तांदळे, प्रा.दिपक मराठे, प्रा अतुल देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, सुधाकर पाटील, सुनिल कासार, नरेंद्र पाटील अशोक परदेशी, सुनिल पाटील, सागर महाजन, नितिन महाजन, भरत ठाकरे, सह सर्व पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे. गायत्री पवार ही भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पवार यांची कन्या आहे. तीच्या या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतूक होत आहे.