कबड्डी स्पर्धेत जी.एस.हायस्कुलचे यश

0

अमळनेर । तालुका शालेय शासकीय क्रिडा स्पर्धा 16 सप्टेंबर 2017 रोजी मारवड येथील मुदंडा हायस्कुल येथे शालेय शासकीय कबड्डी मुलांची स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धामध्ये 17 वर्षे आतील मुलांनी अंतिम सामन्यात जी.एस.हायस्कुलने साने गुरूजी हायस्कुलवर 27 गुणांनी विजय प्राप्त केला. 14 वर्षे मुले ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कुल विजयी, 19 वर्षे मुले प्रताप कॉलेज विजयी, विजयी संघाचा सत्कार साने गुरूजीचे मुख्याध्यापक श्री.देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. या स्पर्धा यशस्वीसाठी तालुका क्रिडा प्रमुख एस.पी.वाघ सर, तालुका क्रिडा समिती डी.डी.राजपुत, एन.डी.विसपुते, महेश माळी,श्री.करंदीकर, श्री.सोंमवशी, के.आर.बाविस्कर सर यांनी काम पाहीले.