मुंबई : शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी ‘कबीर सिंग’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, आता या चित्रपटातील एक सीन चित्रीत करतानाचा शाहिद आणि कियाराचा खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका सीनमध्ये शाहिद आणि कियारा बुलेटवर दिसत आहेत. यावेळी शाहिद लेदर जॅकेटमध्ये तर कियारा अगदी साध्या वेशभूषेत दिसली. ‘कबीर सिंग’ चित्रपट २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य अर्जुन रेड्डी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.