‘कबीर सिंह’चा टीजर रिलीज

0

मुंबई: अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबीर सिंह’चा टीजर अखेर रिलीज झाला. ‘कबीर सिंह’हा साऊथचा हिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेणे वाट पाहत आहे. ‘मी असाच बंडखोर नाही… हा मी आहे…,’असे लिहित शाहिदने ‘कबीर सिंह’चा टीजर शेअर केला आहे.


या चित्रपटात शाहिदच्या अपोझिट कियारा अडवाणीची वर्णी लागली आहे. टीजरमध्ये कियारा अगदी काही सेकंदापुरती दिसते. पण यातही तिच्या चेह-यावरचे भाव मन जिंकून घेतात. टीजरच्या शेवटी शाहिद तिला किस करतो आणि ‘किसी ने नहीं देखा’ असे म्हणतो. यावेळचे कियाराच्या चेह-यावरचे भाव अप्रतिम आहेत. कियाराला दीर्घकाळापासून अशा एका भूमिकेची गरज होती. कदाचित ‘कबीर सिंह’च्या निमित्ताने तिला एक मोठी संधी मिळाली आहे. ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपटही संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.