कब्रस्थानच्या कामासाठी 7 लाखाचा निधी मंजूर

0

दोंडाईचा । निमगुळ ता. शिंदखेडा येथील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानला संरक्षण भिंत बांधावी म्हणून गेल्या 35 वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मागील निवडणुकीत ना.जयकुमार रावल यांनी कब्रस्थान ला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या कामासाठी 7 लाखाचा निधी अल्पसंख्याक निधीतून मंजूर केला असून या कामाचा शुभारंभ रावल यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच दीपक बागल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रघुवीर बागल, हितेंद्र बागल, राजेंद्र बागल, युवराज बागल, सलीम पिंजारी,शहाबुद्दीन शाह, फिरोज शाह, कमरुद्दीन पिंजारी, सादिक पिंजारी, मेहबूब पिंजारी, जावेद शाह, अकबर पिंजारी, सिकंदर पिंजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण गाव काँक्रीटीकरण करण्याचा संकल्प
दरम्यान कब्रस्थानची जागेवर अतिक्रमण झाले होते.तेथील आदिवासी बांधवाचे दुसर्‍या जागेवर पुर्नवसन करून ती जागा मोकळी करून देण्यासाठी विरेंद्र बागल, दीपक बागल यांनी प्रयत्न करून सदर जागेला मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानच्या नावावर करून देत अनेक वर्षाचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढला. निमगुळ गावाला ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव काँक्रीटीकरण करून जिल्ह्यात क्रमांक एकचे गाव तयार करण्याचा संकल्प केला होता त्यात ते यशस्वी झाले असून इतर कामे देखील मार्गी लावण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे, अर्थात यासाठी रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा निधी देण्याच्या बाबतीत मोठा हातभार लागला.