मुक्ताईनगर प्रतिनिधी….. मुक्ताईनगर शहरातील बाजारपेठेमध्ये कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुक्ताईनगर पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता सापळा रचून पकडले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार , अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी वेळोवेळी नाकाबंदी करणे, सराईत गुन्हेगार तपासणी करणे बाबत पोलिसांना सुचना दिल्या होत्या.
त्या प्रमाणे कार्यरत असतांना पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकुर, हवालदार रविंद्र धनगर यांना गोपनीय माहीती मिळाली की 28/08/2023 रोजी रात्री 21.30 वाजता चे सुमारास रविंद्र उर्फ माया तायडे हा कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असुन एखादा गंभीर गुन्हा करण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांना माहीती दिली आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने मदतीसाठी पोलीस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोना मोतीलाल बोरसे, पोअं प्रशांत चौधरी यांची टिम पाठविण्यात आली त्यांनी शिताफिने आरोपी रविंद्र उर्फ माया तायडे यास ताब्यात घेतले असता त्याचे कडे 20,000/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा मिळुन आला त्याचे कडेस अधिक तपास करता त्याने सदरचा कट्टा हा युवराज कडु होंडाळे रा. नशिराबाद ता. जि. जळगांव याचे कडुन घेतल्याचे आणी त्या करीता मयुर विजयसींग राजपुत रा. मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगांव याने त्याचे मोबाईल वरील फोन पे द्वारे समक्ष युवराज कडु होंडाळे याला रुपये 19000/- दिल्याचे सांगीतले त्यावरुन युवराज कडु होंडाळे याला तात्काळ नशिराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. व मयुर विजयसींग राजपुत हा आद्याप फरार आहे.
सदरची कामगीरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक प्रदीप शेवाळे ,पो.उप.निरी. राहुल बोरकर, पोहेकॉ लिलाधर भोई, पोना धर्मेंद्र ठाकुर .पोना मोतीलाल बोरसे, चापोना सुरेश पाटील, पोअं रविंद्र धनगर ,पोअं प्रशांत चौधरी, पोअं राहुल बेहनवाल यांनी केलेली आहे. सदर गुण्याचा तपास पोलीस हवलदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.