नवी दिल्ली: कॉंग्रेसकडून राजस्थानमध्ये अशोक गेहलोत तर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केले आहे. दरम्यान उद्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. कमलनाथ यांच्यासोबत डझनभर मंत्री शपथ घेणार आहे.
सज्जन सिंह वर्मा, तुलसी सिलवाट, के पी सिंह, बाळा बच्चन, पटवारी, आरिफ अक्ले, विजय लक्ष्मी साधो, गोविंद राजपूत, लक्ष्मण सिंह, तरुण भानोत, सचिन यादव, कमलेश्वर पटेल, हिना काव्रे, एनपी प्रजापती, दीपक सक्सेना, संजय शर्मा यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक ११४ जागा जिंकल्या आहे.