कमलनाथ यांनी घेतली शिवराजसिंह चौहान यांची भेट

0

भोपाळ: गेल्या दोन आठवड्यापासून मध्य प्रदेशातील राजकारण सर्वांना ज्ञात आहे. कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केल्याने आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी सामुहिक राजीनामे दिल्याने कमलनाथ यांचे सरकार कोसळले. शेवटी बहुमत चाचणी पूर्वीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रीपदी शिवराजसिंह चौहान विराजमान झाले आहे. काल रात्री त्यांचा राजभवनात शपथविधी झाला. दरम्यान आज माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. मध्य प्रदेशच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली.