कमलनाथ सरकारवरील संकट कोरोनामुळे टळले; दहा दिवसासाठी दिलासा

0

भोपाळ: कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. राज्यपालांनी आज सोमवारी कमलनाथ सरकारला तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. आज विधानसभेचे अधिवेशन देखील सुरु झाले. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बहुमत चाचणी घेण्यात येईल असे वाटत होते. मात्र जगभरात कोरोनामुळे ओढावलेले संकटामुळे कमलनाथ सरकारवरील संकट तूर्त टळले आहे. विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही.