कमलनाथ सरकार कोसळणार, जवळपास निश्चित?

0

भोपाळ: कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. आजच सोमवारी कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आमदारांकडून हात उंचावून बहुमत चाचणी घ्यावी असे, आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्राद्वारे दिले आहेत. २२ आमदारांनी राजीनामे दिल्याने (अद्याप अध्यक्षांनी राजीनामे स्वीकारलेले नाही) कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यानंतर कॉंग्रेसची संख्या ९९ वर येईल आणि भाजपची संख्या १०७ वर जाणार आहे. बहुमत १०४ चे आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार कोसळणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.