दोंडाईचा। आडगाव ता. एरंडोल जि. जळगांव येथील रहिवासी व धुळे पोलिस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले कमलाकर दिलीप चौधरी हे खात्यांतर्गत झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कमलाकर चौधरी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या मुळ गावी म्हणजेच आडगाव येथे पुर्ण झाले. पुढील शिक्षण एरंडोल येथील ऊऊडझ कॉलेज येथे झाले.
विज्ञान शाखेत पदवीच्या दुसर्या वर्षीच त्यांची पोलिस दलात शिपाई यापदावर निवड झाली. घरातील परिस्थिती अत्यंत नाजूक, भुमीहिन, वडील अपंग, आईने शेतमजूरी करून मुलांना शिकविले. याच परिस्थितीने च त्याला अधिकारी होण्याची प्रेरणा दिली.
चौधरी हे पाच वर्षापासून पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांचे अंगरक्षक होते. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी अभिनंदन केले असून कमलाकर चौधरी यांच्या निवडीबद्दल त्यांच्या परिवारासह गावात उत्साहाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.