कमल हसनला काळे फासणार्‍यास इनाम

0

नवी दिल्ली : हिंदू दहशतवादावर वक्तव्य केल्याने हिंदू संघटनांनी कमल हसन यांना घेरले आहे. अलिगढ येथील एका मुस्लिम युवकानेही कमल हसन यांच्या चेहर्‍याला काळे फासणार्‍यास 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हसन यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली असून काही संघटनांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

अलिगड मुस्लिम युथ असोसिएशनचा अध्यक्ष मोहम्मद आमिर राशिदने ही घोषणा केल्याचे वृत्त आहे. कमल हसन हे राष्ट्रविरोधी व्यक्ती आहेत. ते जाणूनबुजून हिंदू-मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर खरच हिंदू उग्र झाले तर देशात कोणताच समाज सुरक्षित राहणार नाही, असेही तो यावेळी म्हणाला.