चेन्नई : अभिनेता कमल हासन लवकरच राजकारणात सक्रीय होणार आहे. स्वतःचा राजकीय पक्ष केव्हा स्थापन करणार याची घोषणा कमल हसन यांनी केलेली नसली तरी 26 जानेवारीपासून राज्याचा दौरा सुरु करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. याआधी दक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांनी 31 जानेवारीला राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
कमल हासन 18 जानेवारीला त्यांच्या राजकीय वाटचालीची संपूर्ण माहिती देणार आहेत. कमल हासन यांनी राज्यातील पलानीस्वामी सरकारवर काही आरोप केले आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यात आणि चांगले प्रशासन देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका कमल हासन यांनी ठेवला आहे.