कमिशनखोर डॉक्टरांना आता दोन वर्ष तुरुंगाची हवा

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ; रावेरात रुग्णालयाचे उद्घाटन

रावेर:– हॉस्पीटलमध्ये पेशंटच्या नावाखाली कमिशन खानारे डॉक्टर आढळल्यास त्यांना दोन वर्ष तुरुंगाची हवा खावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी येथे केले. शहरात एका रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त ते बुधवारी आले होते. याप्रसंगी त्यांनी माहिती दिली.

प्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, सदस्य कविता कोळी, पी.के.पाटील, योगेश पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी आरोग्य सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीकांत महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, महेश चौधरी, भागवत पाटील आदींची उपस्थिती होती.