कमी झोपू नका कंबरेचा घेर वाढेल

0

कमी झोपल्याने चिडचिडे व्हायला होतं असं सर्वच सांगतात. आता कमी झोपल्याने कंबरेचा घेर वाढतो असं सांगून वैद्यकीय शास्त्रज्ञांनी कंबरेच्या शेपबाबत चिंता करणाऱ्यांना शांत झोपा नाहीतर शेप बिघडेल असा इशाराच दिला आहे. कंबरेबाबत हा उतारा किती जणांच्या पचनी पडतोय हे सांगणे मात्र कठिण आहे.

कमी झोपे मुळे शरीर घनता निर्देशांक वाढतो असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. एक हजार ६१५ लोकांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. जी माणसं रात्री सहा तासांपेक्षा कमी किंवा सहा तास झोपतात त्यांच्या कंबरेचा घेर जे त्यापेक्षा अधिक झोपतात त्यांच्यापेक्षा तीन सेंटीमीटरने जास्त असतो. कमी झोपणाऱ्यांमध्ये जाडी वाढवणारा निर्देशांक वाढतो आणि त्यांच्यात कोलेस्टोरॉल कमी कमी असते.

प्रयोगात सहभागी झालेल्यांच्या रक्ताचे नमुने, वजन, रक्तदाब यांची तपासणी केली जात होती. झोपण्याचा कालावधी सहा तास, साडेसात तास आणि नऊ तास असा होता. लॉरा हार्डि यांच्या मते सात ते नऊ तास झोप माणसांसाठी उत्तम असते. या अभ्यास अहवालात कमी झोप आणि निकृष्ठ आहार याबाबत मात्र काहीच सांगितलेले नाही.