Karanji youth dies after drowning in KT Weir dam पारोळा : के.टी.वेअर बंधार्यात बुडाल्याने करंजी बुद्रुक येथील तरुणाचा मृत्यू ओढवला. गुलाब संतोष रोकडे (45) असे मयताचे नाव आहे. ही घटना शनिवार, 10 रोजी उघडकीस आली. योगेश प्रकाश रोकडे यांची खबरीनुसार पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गुरांना पाणी देण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना
गुलाब संतोष रोकडे (45) हा तरुण शुक्रवारी सायंकाळी गावातील सहा वाजता गणपती विसर्जन संपवून सायंकाळी 6.30 वाजेचे सुमारास शेतात गुरा-ढोरांना चारा-पाणी देण्यासाठी गेला असता घरी परतला नाही मात्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही तर शनिवार, 10 रोजी सकाळी सात केटीवेअर (बंधारा) जवळ तरुणाचा मृतदेह आढळला.