बोदवड : तालुक्यातील करंजी येथे 30 मार्च रोजी योगेश निकम यांच्या घराला आग लागल्याने विविध संसारोपयोगी साहित्य, अन्न धान्य व म्हैस विकून आलेले 50 हजार रोख रक्कम असे सर्व मिळून 1 लाख 10 हजार रुपयांचे नूकसान झाले होते. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनसारखी भीषण परीस्थिती सल्याने मजूरी करुन पोट भरणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात घर जळाल्याने कुटूंबावर मोठे संकट आले आहे. करंजी येथील तलाठी मोनिका बडगूजर व मंडळ अधिकारी एम.पाटील यांनी पंचनामा करुन नैसर्गिक आपत्तीचा तहसिलदारांकडे अहवाल सादर केला आहे. याप्रसंगी या कुटुंबाची भेट घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तीगत या कुटुंबास 15 हजारांची रोख मदत केली. शासनाकडून भरीव मदत लवकरात लवकर मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, दीपक माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.