करंजी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

0

नवापूर । तालुक्यातील करंजी बुद्रूक गटात 80 लाख रुपये खर्चीक विविध विकास कामांचा व जिल्हापरिषद जनसुविधा योजने अंतर्गत चौकी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत कामाचा शुभारंभ माजी जि. प अध्यक्ष भरत गावीत यांचा हस्ते नारळ फोडून करण्यात आला. पं. स उपसभापती दिलीप गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आर. सी. गावीत, सरपंच सुनिल गावीत, उपसरपंच दारासिंग गावीत, रवि गावीत, ग्राम सदस्य मगन गावीत, वसंत गावीत, अनिल गावीत, दिलवरसिंग गावीत, रोहीनी गावीत, कुंनती गावीत, अभियंता शरद चव्हाण, ग्रामसेवक अरुण मोहिते उपस्थित होते.

विविध विकासकामांचा शुभारंभ
यासह कोटखाब येथे स्मशानभुमि पर्यंत रस्ता कॉक्रीट करणे, या नंतर कामोद ते स्मशानभूमिपर्यंत रस्ता कॉक्रिट करणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुनिता गावीत, उपसरपंच दत्तु गावीत, सुनिल गावीत, सुनिता गावीत, दिनु गावीत, आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार करंजी बु सरपंच रमिला गावीत व कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आर. सी. गावीत यांनी केला. यावेळी ग्राम सदस्य जेकु गावीत, समवेल गावीत, रमेश गावीत, सौ नामी गावीत, आलु गावीत, नजु गावीत, रसु गावीत, सुनिता गावीत, हेमलता कुंवर, नारायन गावीत, रविदास गावीत, पाण्या गावीत, छगन गावीत, शांताराम कुंवर, ग्रामसेवक विजय गावीतआदी उपस्थित होते. या नंतर ग्रामपंचायत सवरक्षण भितिचे कामांचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि. प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की गावाचा विकास कामामध्ये आणखीन एका इमारतीची भर पडली आहे, या ग्रामपंचायतींच्या इमारतीचा उपयोग विकास कामासाठी करा, गाव विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची आहे. तसेच संरक्षण भितीचे काम चांगल्या दर्जाचे करा व गावांचा विकासाठी विविध योजना घेऊन येणार्‍यांसाठी प्रयत्न करा, आम्ही यासाठी मदत करु. एकजुटीने गावाचा विकास करा, सूत्रसंचालन आर. सी. गावीत यांनी तर आभार समवेल गावीत यांनी मानले.