करंजी विद्यालय येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0

नवापूर । तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी बुद्रुक येथे नुकत्याच महाराष्ट्र वन मिलि अन फुटबॉल स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष विजय गावीत, मुख्याध्यापक सुरेश घरटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत वर्ग 8 वी ते 12 वी मधील खेळाडूंचा समावेश होता. सर्व प्रथम वर्ग 11 वी आणि 12 वी तील खेळाडूंची स्पर्धा झाली. यात 12 वीच्या विद्यार्थ्यानी 71 फरकाने मॅच जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मुलींमध्ये 11 वीच्या संघाने बाजी मारली. 9 वी आणि 10 वी मुलांबरोबर सामना झाला. यात 10 वीच्या मुलांनी बाजी मारली. मुलींमध्ये 10 वींच्या मुलींनी बाजी मारली. 8 वीच्याच दोन्ही संघामध्ये टाय सामना झाला.

एकसंघ भावनेने खेळले विद्यार्थी
या स्पधर्ेंत फुटबॉल खेळाचे नियम लक्षात आले आणि सवर्ं मुलांना हा खेळ बघण्यात एक प्रकारचा आनंद मिळाला. पंच म्हणुन आर. के. सिंग तर टाइम कीपरचे काम संजय बागूल यांनी पाहिले. सर्व विद्यार्थ्यानी एक संघ भावनेने खेळ केला. सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.