चाळीसगाव । सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या चाळीसगाव येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे करगांवरोड लगतच्या भिल्ल वस्तीवर जावून गरीब गरजू विद्यार्थ्यांना सोमवार 19 जुन 2017 रोजी मोफत वह्या आणी पेन वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिष जैन, विनायक दवे व वसुंधरा फाउंडेशनचे पदाधिकारी अजय जोशी, सचिन पवार, देवेन पाटील, गजानन मोरे सर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी गरीब मुलांना आणी त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले.
पालकांमध्ये समाधान
वस्तीतील जवळपास 30 ते 35 गरीब व गरजु विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्या आणी 2 पेन मोफत वाटण्यात आले. वसुंधरा फाऊंडेशनने नेहमी समाजातील गरजू, गरीब घटकांना निरनिराळ्या प्रकारे नेहमी मदतीचा हात पुढे केलेला आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थी व पालकांनी त्यांचे आभार मानले.