चाळीसगाव – शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करगाव व चाळीसगाव हद्दीत सर्वे नंबर २१४ या प्लॉट पडलेल्या शिवारात असलेल्या विहिरीत करगाव येथील शेतकरी बाबू जोरसिंग पवार (वय 52) या शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला आहे बाबु पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्याचेवर विकास सोसायटीचे सुमारे एक लाख रुपये कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे एक मुलगा, तीन मुली असलेल्या या शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबू पवार हे सकाळी पाच वाजता शौचास जातो असे सांगून घरून निघाले होते. मात्र नऊ वाजले तरी ते घरी परतले नाही म्हणून त्यांचा परिवाराने शोध घेतला असता सदर विहिरीजवळ त्यांची चप्पल आढळून आली .व पाण्यात मृतदेह तरंगताना दिसत होता त्यामुळे अख्खे करगाव विहिरी जवळ जमा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.