करगाव येथे पतीने केली पत्नीची हत्या

0

मद्याच्या नशेत डोक्यात मारली लोखंडी टॉमी ; नातेवाईकांची पोलिसात धाव

चाळीसगाव- तालुक्यातील करगाव तांडा क्रमांक चार येथे पती-पत्नीत झालेल्या भांडणानंतर संतप्त पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लोखंडी टॉमी टाकल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेत सकुबाई जाधव (42) यांचा मृत्यू झाला असून संशयीत आरोपी आप्पा बाळू जाधव (47, करगाव तांडा नंबर चार) विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मयत सकुबाई यांच्या पश्‍चात चार मुले, मुलगी असा परीवार आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसात आरोपी स्वतःहून शरण
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये बुधवारी सकाळी भांडण झाले होते तर उभयंतांमध्ये झालेल्या हाणामारीत संशयीत आरोपी असलेल्या पतीने लोखंडी टॉमी पत्नीच्या डोक्यात टाकली. रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी पती स्वतःहून पोलिसात हजर झाला.a