कोलकाता : करचुकवेप्रकरणी जीएसटी कार्यालयाने भारतीय आयुर्विमा महामंडळाला 2,050 कोटी रुपयांची नोटीस धाडली आहे. करचुकवेगिरीप्रकरणी एलआयसीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. अनेक विमाधारकांनी हफ्त्याचे पैसे न भरल्याने एलआयसीने त्यांची पॉलिसी बंद केली होती. मात्र एलआयसीने ही माहिती दडपली. तसेच, या रकमांवरील सेवाकराची चुकवेगिरी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती एका वरिष्ठ कर अधिकार्याने दिली. हे प्रकरण जुलै 2012 मधील आहे.
जीएसटी (वस्तू व सेवाकर) इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या कोलकाता विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली आहे. एलआयसीव्यतिरिक्त देशात 23 विमा कंपन्या असून अन्य कंपन्यांनीही या प्रकारे माहिती दडवली असल्यास त्यांनाही जीएसटीच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.