अमळनेर । बोरी काठावरील सर्व गावे एकमेकांशी जोडण्यासाठी बोरी नदिवर ठिकठिकाणी पुलांचे निर्माण करून तासखेडा ते अंतुर्ली दरम्यान पुलाचे काम सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. त्याच पद्धतीने मुडी ते करणंखेडा दरम्यानही पुलासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पंचक्रोशीतील गावांसाठी हे पूल वरदान ठरतील, अशी भावना आमदार शिरीष चौधरी यांनी करणंखेडा येथे आयोजित अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केली. सदर कार्यक्रमास मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांनी अनेक गावांत ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक ग्रामपंचायत हायटेक होत असून या नव्या व अत्याधुनिक इमारतीतून गावाचा कारभारही त्याच दर्जाचा होत असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांकडून आमदारांचा सत्कार
शासनाच्या माध्यमातून सुमारे 10 लाख निधीतून करणखेडा येथे अत्याधुनिक ग्रा.पं. कार्यालयाचे काम पूर्णत्वास आल्याने याचे लोकार्पण व उद्घाटन आमदार चौधरी यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. आ चौधरी यांचे गावांत आगमन होताच गावातील राणाजी बँड पथकाने त्यांचे जल्लोषात स्वागत करून सर्वांचे लक्ष वेधले तसेच ग्रामपंचायत तर्फे शेतकर्यांचे खरे कैवारी म्हणून प्रतिकात्मक बैलगाडी आमदारांना भेट दिली. यावेळी उद्घाटनानंतर आमदारांनी ग्रामपंचायत कार्यालायसह अनेक विकासकामे दिल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थानतर्फे आमदारांचा भव्य सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात आमदार चौधरी यांनी बोरी नदीवर ठिकठिकाणी पुलांचे निर्माण करण्यासोबतच गावातील विठ्ठल मंदिर देवस्थानासाठी सुमारे 2 कोटी निधी आणून देवस्थानचा विकास करण्याचे व ग्रामपंचायत जवळ स्ट्रीट लाईट लावण्याचे वचन दिले यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आमदार शिरीष चौधरी, प्रा.अशोक पवार, श्रीराम चौधरी, किरण गोसावी, विश्वास महाराज, नरेंद्र चौधरी, अनिल महाजन, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, पंकज चौधरी, प्रवीण सातपुते, सुधीर चौधरी, आनंदसिंग पाटील, विनोद चौधरी, सरपंच अलकाबाई युवराज धनगर, उपसरपंच गणेश गुरव, अनुसयाबाई पंडित पाटील, वस्तलाबाई सोनवणे, सुनंदा पाटील,गुलाब धनगर, शरद पवार, ग्रामसेवक जी.व्ही.सूर्यवंशी, विजय भिल, रविंद्र चौधरी, पंकज धनगर, रविंद्र गुरव, शरद बागुल, अभिषेक पांडे, अमोल धनगर, आसाराम धनगर, भरत पाटील, जयवंत पाटील, आत्माराम पाटील, बाळकृष्ण लोहार, दिलीप पाटील, युवराज धनगर, आबा गुरव, किरण मनोरे, ग्रामस्थ व मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.