मुंबई : सध्या सोशल मीडियावर #MeTooचे जोरदार वादळ सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी या मोहिमेबाबत आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूडची ‘क्विन’ कंगना रनौत हीनेही या मोहिमेवर आता तिचे मत व्यक्त केले आहे. आणि यावेळी कंगनाने दिग्दर्शक करण जोहरला बोट दाखवले आहे.
कंगना रनौत तिच्या बिंदास स्वभावासाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत बोलताना ती बोलली, की या मोहिमेतून अनेक महिला समोर येत आहेत. यातून अनेक कलाकारांचे, दिग्गज व्यक्तिंचे चेहरे समोर आले. यावर चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकारांनी यावर आपले मत व्यक्त करायला हवे. एरवी प्रत्येक विषयावर बोलणारा करण जोहर मात्र आज का गप्प आहे? असा प्रश्न करून कंगनाने करण जोहरवर निशाना साधला आहे.
करण जोहर सोबतच तिने शबाना आझमीचेही नाव घेतले . शबाना आझमी आणि करण जोहरसारख्या व्यक्तींनी यावर व्यक्त व्हायला पाहिजे, असे कंगनाने म्हटले आहे.