करमज्योतीने जिंकले कांस्यपदक

0

लंडन । भारताच्या करमज्योतीने महिलांच्या एफ-55 गटात जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देशाल तिसरे पदक मिळवून दिले आहे. करमज्योतीने महिलांच्या एफ-55 गटातील थाळीफेक स्पर्धेत 19.02 मिटर फेक करत तिसर्‍या क्रमांकासह भारताला कांस्यपदक जिकून दिली. करमज्योतीने बहरिनच्या अलोमारी रोबाला (19.01 मिटर) मागे टाकत हे यश मिळवले. सुरुवातीला करमज्योती या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होती. पण तिसर्‍या स्थानावर असलेल्या चीनी खेळाडू यांग लिवानला अपात्र ठरवण्यात आल्यावर करमज्योतीला आपसूकच तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळाली.

पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी सुंदरसिंग गुर्जरने पुरुषांच्या भालाफेकीत देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर दोन दिवसांनी अमित सरोहाने क्लब थ्रो स्पर्धेतील एफ 51 गटात रौप्यपदक जिंकले होते.