चाळीसगाव – तालुक्यातील करमुड येथील २८ वर्षीय ईसमाने घरातच गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७-३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी तालुक्यातील करमुड येथील किरण रोहीदास निकम (२८) हे त्यांची पत्नी माहेरी गेली असल्याने घरी एकटेच होते आज १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७-३० वाजेच्या सुमारास त्यांचे वडील त्यांच्या घराजवळुन जात असताना घराचा बंद दिसल्याने त्यांनी मुलगा किरण यास आवाज दिला मात्र घरातुन काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उघड्या खिडकीतुन आत पाहीले असता किरण रोहीदास निकम यांचा मृतदेह घराच्या छताच्या ॲंगलला दोरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळुन आला त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडुन आत प्रवेश केला याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला भगवान अर्जुन निकम रा करमुड यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास सहाय्यक फौजदार कुमावत करीत आहेत.