भुसावळ। मार्चअखेरीस थकीत कर वसुलीसाठी पालिकेने जोरदार मोहीम सुरू केली यांच्या पथकाने शहरातील जामनेर रस्त्यावरील अग्नीशमन केंद्राजवळील व्यापारी संकुलात असलेल्या तीन गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. यासाठी पालिकेने करवसुली मोहिमेला गती दिली आहे. कर भरणार्या थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात येत आहे. मंगल शारदा पंतसंस्थेने मागील चार वर्षांपासून 3 लाख 3 हजार 37 रुपये कर थकविल्याने या पतसंस्थेच्या कार्यालयास रविवार 26 रोजी सिल करण्याची कारवाई झाली. तर सोमवार 27 रोजी गोपाळ नगर व शिवाजी कॉम्प्लेक्स येथील 13 गाळेधारकांनी कराचा भरणा न केल्यास हि गाळे सील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी दिली. पालिकेने शहरातील करवसुलीसाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यात पाच पथकांतील 50 कर्मचार्यांकडून शहरातील विविध भागातील कर थकीत असलेले मालमत्ताधारक आणि पालिकेच्या व्यापारी संकुलांतील गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार्या थकबाकीदारांच्या गाळे सिल केले जात आहेत. पालिकेतर्फे थकीत करदात्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार कारवाई केली जात आहे. थकबाकीदारांनी पालिकेची थकबाकी भरल्यास लावलेले सील त्वरीत काढले जाते.
यांच्या पथकाने केली कारवाई
या पथकात कर अधिक्षक सुभाष ठाकूर, गोपाळ पाळी, मोहन भारंबे, राजेंद्र चौधरी, राजु टाक, जयकुमार पिंजाणी यांचा समावेश आहे. थकित करदात्यांच्या मालमत्ता जप्त करणे, लिलाव करणे, आदींसारख्या कारवाई पालिका आता प्राधान्याने सुरू करणार आहे. तरी शहरातील करदात्यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा करून पालिकेला सहकार्य करावे. तसेच कारवाईचा कटू प्रसंग टाळावा. शहराच्या विकासात कर रूपाने मदत करावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पालिका प्रशासनातर्फे शहरातील ज्या भागात पालिकेचा कर चुकविणार्यांची संख्या अधिक आहे. अशा विविध 10 चौकांमध्ये या थकबाकीदारांची नावे फलकावर प्रकाशित करुन ते लावण्यात आले आहे. यामुळे थकबाकीदारांमध्ये धडकी भरली असून याठिकाणी नावे पाहण्यासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती.