करवाढीबाबत सखोल चर्चेसाठी बैठकीचे आयोजन

0

आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकार

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केलेल्या वाढीव कर आकारणीची माहिती तसेच नागरिकांच्या आलेल्या करवाढीच्या तक्रारींबाबत सखोल चर्चा करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी मुख्याधिकारी व नगरसेवक यांची बैठक आयोजित केली होती. राज्य शासनाच्या नियमानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली आहे. त्यानुसार मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या नोटीसा दिल्या आहे. या नोटीसा दिल्यानंतर काही नागरिकांनी आमदार बाळा भेगडे व नगरसेवकांकडे वाढीव कराबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार सर्व समावेशक बैठक आमदार भेगडे यांनी बोलावली होती. या बैठकीस नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील सह नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केलेल्या कर आकारणीचे सविस्तर विवेचन केले. यावर काही नगरसेवकांनी व आमदार बाळा भेगडे यांनी नागरिकांना हि कर आकारणी समजण्यासाठी पत्रके काढावी, फ्लेक्स लावावेत. नागरिकांच्या तक्रारीची दाखल घेण्यासाठी कक्ष स्थापन करावे. तक्रार अर्ज त्वरित दाखल करून घ्यावेत. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या. त्याप्रमाणे त्वरित सुचनांवर कारवाई करावी असे आमदार बाळा भेगडे यांनी समारोप प्रसंगी सांगितले.